श्री. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन B.A. पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. आणि भक्तीसंगीत व नाट्यसंगीत यावर ते Ph.D. करीत आहेत. संगीत शिक्षणासाठी त्यांना अनेकांचे मार्गदर्शन लाभले. उदारणार्थ मुकुंदबुवा गोखले, पित्रे बुवा, पं. आगाशे बुवा, पं. शरद गोखले, मधुकर खाडिलकर, पं. विजय बक्षी, ऋषिकेश बडवे आणिही अनेकांकडून.
नाट्यप्रयोगांसाठी त्यांनी नाट्यगीत गायनाचे विशेष मार्गदर्शन प्रसिद्ध ऑर्गन तपस्वी श्री. राजीव परांजपे यांच्याकडे घेतले. श्री. शिलेदार यांच्या मराठी रंगभूमीच्या अनेक संगीत नाटकांना बुवांनी ऑर्गन साथ केली आहे. नाट्य अभिनयासाठी श्री. रवींद्र खरे, श्री. विजय गोखले व श्री. अशोकजी समेळ – यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर. दीनानाथजींनी जुन्या काळात संगीत रंगभूमी गाजवली. रणदुंदुभी नाटकात दीनानाथांनी साकारलेली राणी तेजस्विनीची भूमिका खूप गाजली.
View Moreराष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे हे नाव कानी येताच एक आगळा वेगळा विलक्षण माणूस नजरेसमोर येतो. व्यायामाने कमावलेले धिप्पाड शरीर, उंच-निंच आकृती, काळा-सावळा रंग, राकट उग्र पण तरीही रेखीव रुबाबदार चेहरा, शुभ्र धोतर-सदरा, काळा कोट आणि काळी टोपी, कीर्तनांचे वेळी भगव्या रंगाचा ऐटबाज फेटा, शाल या साऱ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसा पहाडी खडा आवाज !
सर्वसामान्य माणसापेक्षा अनेक बाबतीत ते निराळे होते. पारंपारिक पठडीतून बाहेर पडून राष्ट्रवीरांच्या, क्रांतिकारकांच्या कथा आणि शुद्ध हिंदुत्वनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टीकोन ठेऊन, आजच्या ताज्या राजकारणाशी त्याचा योग्य सांधा जोडून ते प्रखरपणे दाखवणारे, अंधश्रद्धेवर कडक टीका करणारे आणि ज्यांच्या कीर्तनाला तरुण - बाल - वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.
View More