ह.भ.प. श्री चारुदत्त गोविंदस्वामी आफळे

राष्ट्रीय कीर्तनकार

कीर्तन सेवा

श्री चारुदत्त गोविंदस्वामी आफळे हे संपूर्ण भारतात आणि परदेशातही 'राष्ट्रीय कीर्तनकार' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना कीर्तनाचे शिक्षण आई वडिलांकडूनच (कै. गोविंदस्वामी आफळे आणि कै. सुधाताई आफळे) मिळाले. आफळे घराण्यात कीर्तनाची परंपरा चारशे वर्षांपासून आहे. आफळे घराणे मूळ क्षेत्र माहुलीचे, सज्जनगड पायथ्याचे. समर्थांचे काळापासून या घरात कीर्तन सेवेचे व्रत आहे. ते व्रत बुवा निष्ठेने पार पाडित आहेत. कीर्तनाच्या क्षेत्रात बुवांचे नाव आघाडीचे कीर्तनकार म्हणून घेतले जाते.

1988 ते 2023 ह्या 35 वर्षात त्यांनी 10,000 च्या वर कीर्तने, प्रवचने केली आहेत. भारतात महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, कर्नाटक, दिल्ली तसेच अनेक वेळा अमेरिका, कॅनडा, दुबई, कुवेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अश्या देशांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे.

रत्नागिरी इथे गेली 12 वर्षे सलग ‘कीर्तनसंध्या’ या कार्यक्रमांतर्गत शिवाजी महाराज तेह कारगिल चे युद्ध असा संपूर्ण इतिहास कीर्तनातून मांडला आहे. आकाशवाणी साठी ‘बोराची शेती कशी करावी’, सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ तसेच ‘कचरा निर्मूलन’ किंवा पुण्यातील Dibetic association साठी ‘मधुमेह’ यांसारख्या वेगळ्या विषयांवर त्यांनी कीर्तन केले आहे. भारताने केलेल्या surgical strike विषयी सुध्हा त्यांचे कीर्तन झाले आहे.

कीर्तनाचे विषय
  • संत चरित्रे
  • ऐतिहासिक चरित्रे
  • समाजसुधारकांची चरित्रे
  • स्वातंत्र्यसैनिकांची चरित्रे
  • सामाजिक विषय

शैक्षणिक पार्श्वभूमी

शैक्षणिक पदवी
  • B.A. - मराठी विषय
  • M.A. - संगीत विषय
  • Ph.D. - भक्ति संगीत, कीर्तनी संगीत आणि नाट्य संगीत
संगीत गुरू
  • श्री. मुकून्दबुवा गोखले
  • मधुकर खाडीलकर
  • पं. शरद गोखले
  • पं. विजय बक्षी
  • राजीव परांजपे

संगीत नाट्यसेवा

शालेय वयापासून त्यांनी संगीत नाटकांतून विविध भूमिका केल्या आहेत. किर्ती शिलेदार यांच्या नाटक कंपनी मध्ये ऑर्गन ची साथ सुद्धा त्यांनी केली. कट्यार काळजात घुसली या नाटकात बालपणी छोटा सदाशिव, आणि आता या नाटकाचा कळस अशी खा साहेबांची भूमिका, जी भूमिका पूर्वी पंडित वसंतराव देशपांडे यांनी गाजविलेली, ती आता आफळे साकारतात.

रंग शारदा प्रतिष्ठानच्या स्वर सम्राज्ञी नाटकात गंगाधर बुवांची भूमिका त्यांनी विजय गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली केली. तसेच नागपूर नजीक झाडेपट्टी मध्ये नाटकात विविध भूमिका केल्या आहेत.

‘वैभव नाट्यसंगीताचे’, ‘एक नाटक एक बैठक’ असे मराठी नाट्यसंगीतावरील अभ्यासपूर्ण कार्यक्रम ते सादर करतात. यातील नाट्य संगीताच्या सादरीकरणासाठी राजीव परांजपे यांचे मार्गदर्शन श्री. आफळे यांना लाभले आहे.

सन 2000 मध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर जन्मशताब्दी निमित्ताने मंगेशाकारांनीच गाजवलेली रणदुंदुभी हे नाटक भरत नाट्य संशोधन मंदिराने सादर केले. त्यात मंगेशकरांनी साकारलेली तेजस्विनी ची स्त्री भूमिका आफळे यांनी साकारली होती.

नाटक भूमिका
संगीत शाकुंतल राजा दुष्यंत
संगीत सौभद्र कधी नारद/कधी अर्जुन/कधी कृष्ण
संगीत मानापमान धैर्यधर
संगीत कान्होपात्रा संत चोखामेळा
संगीत विद्याहरण देवगुरु कच
संगीत मत्स्यगंधा पराशर
संगीत कट्यार काळजात घुसली छोटा सदाशिव, खा साहेब
संगीत रणदुंदुभी तेजस्विनी
संगीत स्वर सम्राज्ञी गंगाधर बुवा

पुरस्कार आणि सन्मान

  • पुणे मराठी ग्रंथालय - पाटणकर पुरस्कार
  • अखिल भारतीय नाट्य परिषद - पलुस्कर पुरस्कार
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - 2003
  • बालगंधर्व पुरस्कार - 2013
  • राष्ट्रीय कीर्तन सम्राट - 2015
  • कीर्तन मुनी पुरस्कार - 2016
  • समर्थ सेवा पुरस्कार - 2018
  • सातारा भूषण पुरस्कार - 2020
  • जिवा महाले पुरस्कार - 2021
  • समाज शिक्षक पुरस्कार - 2023

दूरदर्शन, चित्रपट आणि माध्यमे

दूरदर्शन कार्यक्रम
  • E TV मराठी - मनोबोधावर प्रवचन
  • स्टार माझा - पंढरी वारी कीर्तन
  • DD 10 - गणेश दर्शन मालिका
  • Z टॉकीज - गजर कीर्तनाचा
चित्रपट आणि माहितीपट
  • संत नामदेव चित्रपट
  • बालगंधर्व माहितीपट
  • सावरकर माहितीपट
  • पंडित पलुस्कर लघुपट

सामाजिक बांधिलकी

पारंपरिक विषयांबरोबरच आफळे अनेक विविध पद्धतीचे सामाजिक विषयसुद्धा कीर्तनातून हाताळतात. आकाशवाणी साठी 'बोराची शेती कशी करावी', सरकारी कार्यक्रमांमध्ये 'पाणी अडवा पाणी जिरवा' तसेच 'कचरा निर्मूलन' किंवा पुण्यातील Dibetic association साठी 'मधुमेह' यांसारख्या वेगळ्या विषयांवर त्यांनी कीर्तन केले आहे.

  • येरवडा कारागृहातील कैद्यांसाठी कीर्तने
  • भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयोग
  • कोरोनाकाळात पोलिसांना मदत
  • गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मदत
  • राष्ट्रीय कीर्तनाद्वारे देशभक्ती
  • कीर्तन प्रशिक्षण व अध्यापन